न्हावीच्या तरुणीची आत्महत्या


यावल – तालुक्यातील न्हावी येथील युवतीने गळफास घेत आत्महत्या केली. हिना नबाब तडवी (19) असे मृत तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी शनिवारी दुपारी चार वाजेच्या तिने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी
यावल- शहरातील बुरुज चौकात सायंकाळच्या सुमारास भुसावळकडुन चोपड्याकडे जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.17 जीए 6359) ने पादचारी मधुकर झिपरू तायडे (58, यावल) यांना धडक दिल्याने ते जखमी झाले. ट्रक चालक ईश्‍वरलाल सुतार (राहणार मंदसोर मध्यप्रदेश) व क्लिनर खालीद यांना ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसर्‍या घटनेत शरद चांगो गजरे (32, रा.चुंचाळे ) हे शनिवारी दुपारी आपल्या घराच्या छतावर पत्रे ठोकण्याचे काम करीत असतांनाखाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत.


कॉपी करू नका.