माजी मंत्री खडसे काँग्रेसमध्ये आल्यास स्वागतच : बाळासाहेब थोरात
मुंबई : कोणताही पक्ष समर्थ नेत्याला जवळ करण्याचा प्रयत्न करतो,’ मात्र ‘भाजपमध्ये जनमानसाचा आधार असणारा नेता नको असून माजी मंत्री एकनाथराव खडसे हे काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशी भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. खडसेंची अवहेलना आता पाहवत नाही, असं सूचक वक्तव्य थोरात यांनी केले असून एका ज्येष्ठ नेत्याचा फोन न घेणं योग्य दिसत नाही. भाजपच्या नाराज नेत्यांनी, त्याचबरोबर समाजानेही ओळखलं पाहिजे की भाजपची रणनिती आपल्या हिताची आहे का? राज्याच्या, देशाच्या हिताचं आहे का?’, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली आहे.
