हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले


धरणाच्या लाभक्षेत्रात संततधार पाऊस

भुसावळ : हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या संततधार पावसानंतर रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास धरणाचे 24 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास 38.30 टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पहाटे 24 दरवाजे उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 174 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने रविवारी पहाटे 24 गेट पूर्णपणे उघडण्यात आले. धरणातून प्रति सेकंद 3628 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून डाव्या कालव्यातून 8.0 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. गेल्या 24 तासात बर्‍हाणपूर येथे 0.2, देडतलाई 12.2, टेक्सा 109, एडी 2, गोपालखेडा 1.6, चिखलदरा 4.5 व लखपुरी येथे 4 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.