विधान परीषद निवडणूक बिनविरोध


मुंबई : महाराष्ट्र विधान परीरषद निवडणुकीसाठी 13 पैकी चार उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ.अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पक्ष), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पक्ष), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) या चार उमेदवारांनी आज आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

हे सदस्य झाले बिनविरोध
भाजपाचे गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजीतसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड तसेच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व डॉ.नीलम दिवाकरराव गोर्‍हे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत जयवंतराव शिंदे व अमोल रामकृष्ण मिटकरी व काँग्रेस राजेश धोंडीराम राठोड हे विधान परीषद सदस्य बिनविरोध निवडून आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !