भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated at D.N. Bhole College inBhusawal. भुसावळ (14 एप्रिल 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ राजू फालक यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महामानवाने दाखवला उन्नतीचा मार्ग
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सांगितले की, डॉ.आंबेडकर यांचे जीवन हे शिक्षणाच्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म असूनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर केवळ स्वतःचे जीवन घडवले नाही तर संपूर्ण समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवला. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय माणूस अज्ञानाच्या अंधारातच राहतो. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही, तर ते व्यक्तिमत्त्व विकासाचे, विचारशक्ती वाढवण्याचे आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य मिळवण्याचे सर्वात मोठे साधन मानले..



यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, सुधाकर चौधरी, विजय पाटील उपस्थित होते.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !