आधी झाडली पिस्तूलातून गोळी ; नंतर कोयत्याने वार करीत तरुणाची हत्या


First, a shot was fired from a pistol ; then, a youth was murdered in a machete attack. पुणे (16 एप्रिल 2026) : येरवडा परिसरात वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून कोयत्याने वार करीत हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव गणेश तेलंगी (18, सध्या रा. बिंडसर वस्ती, नर्‍हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

असे आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरव, त्याचे मित्र रवी कोळी, शाहरुख शेख, रेहान हे दुचाकीवरून विश्रांतवाडी भागात आले होते. येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात त्यांनी दुचाकी लावली होती. आरोपींशी गौरव याचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. वादातून आरोपींनी गौरवचा खून करण्याचा कट रचला होता. विश्रांतवाडीतील कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौरव आणि त्याचे मित्र पंचशीलनगर परिसरात लावलेली दुचाकी घेण्यासाठी निघाल्यानंतर आरोपींनी येरवड्यातील कॉमर्स झोन आयटी कंपनीजवळील रस्त्यावर आरोपींनी गौरवला गाठले आणि त्याच्यावर हल्ला चढवला.

यांच्याविरोधात गुन्हा
खून प्रकरणी तौफीक शेख, समीर शिंदे, राजन दोरास्वामी (तिघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सयान निजामुद्दीन शेख (वय 18, रा. वैदुवाडी, इंदिरानगर, हडपसर) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !