खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले ; महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही मात्र….!


मुंबई (16 एप्रिल 2026) : सरकारने विरोधकांशी चर्चा करायला हवी होती मात्र थेट मसुदा समोर आणण्यात आला वास्तविक हे बिल यापूर्वीच मंजूर झाले असून आमचा महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही मात्र मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या ‘मनमानी’ला विरोध आहे व तो कायम राहणार, असल्याचे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, 364 मते असल्याशिवाय हे मंजूर होणार नाही. सरकारकडे 292 मते असून आम्ही मतदान करत नारी शक्ती विधेयकाला विरोध करीत हे बिल पाडणार आहोत.

2023 मध्येच बिल मंजूर
संजय राऊत म्हणाले की, नारी शक्ती हे बिल 2023 मध्ये मंजूर झाले आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांना फसवत आहे. त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही चर्चा होत्या. हे बिल ऐतिहासिक आहे, असे केंद्र सरकार म्हणत आहे. सध्या जितके खासदार आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण द्या, नवे मतदारसंघ निर्माण करत तुम्हाला हे बिल लादायचे आहे, सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यांना हे बिल मंजूर करण्यासाठी बहुमत मिळणार नाही. नारी शक्ती बिल नसून केवळ भाजपा शक्ती बिल आहे. हे बिल आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही.

उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार
संजय राऊत म्हणाले की, पाच राज्यात निवडणुका असताना हे बिल मंजुरीसाठी आणायची सरकारला काही गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर करायची आहे, लोकशाही मजबूत करायची आहे. महिलांचा लोकशाहीत सहभाग वाढवायचा आहे. पण अनेक खासदार सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना तुम्ही मतदानापासून रोखत बिल मंजूर करून घेऊ, असा सरकारचा प्रयत्न आहे. केरळमधील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत, पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांना आणायचा प्रयत्न आहे तर द्रमुकचे सर्व खासदारही अधिवेशनासाठी उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करतील.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !