भुसावळात भगवान परशूराम जन्मोत्सवानिमित्त 19 रोजी विविध कार्यक्रम
Various programs to be held in Bhusawal on the 19th on the occasion of Lord Parashurama’s birth anniversary. भुसावळ (16 एप्रिल 2026) : ब्राह्मण समाजाचे आराध्य देवत भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमिताने विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा विशेष बाब म्हणजे शोभायात्रेत डीजे लावता पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात महिला व मुलींचे लेझीम पथक तलवार तसेच परशुराम भगवान यांचा अस्त्र फरसा पथक ध्वज पथकासह रविवार, 19 रोजी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तीन दिवस भरगच्च कार्यक्रम
जन्मोत्सवानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 17 रोजी संध्याकाळी सात वाजता ब्राह्मण संघ, न्यू एरिया वॉर्डमध्ये वक्त्या सौ.अनघा कुलकर्णी (भुसावळ) तसेच याच दिवशी आठ वाजता राजेश बहुगुणा (ऋषिकेश उतरांचल) यांचे व्याख्यान होईल.

दुसर्या दिवशी शनिवार, 18 रोजी शहरातून भव्य दुचाकी रॅलीला जामनेर रोडवरील श्री साई बाबा मंदिरापासून सुरुवात होईल तर तापी नदीजवळील श्री भगवान परशुराम मंदिराजवळ रॅलीचा समारोप होईल.
तिसर्या दिवशी रविवार, 19 रोजी जामनेर रोडवरील अष्टभूजा माता मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरूवात होईल व म्युन्सीपल पार्कातील श्री राम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप होईल. आठ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षपदी वेदप्रकाश ओझा
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमिताने समितीचे गठण करण्यात आले असून अध्यक्षपदी वेदप्रकाश जी.ओझा तर उपाध्यक्षपदी रोहित कुलकर्णी व आदित्य शर्मा यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीत सचिव घनश्याम मिश्रा, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी धनजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. निवडी संगी माजी समिती अध्यक्ष भूषण जोशी, कैलाश उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला, उमाकांत शर्मा (नमा), अनिरुद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, प्रवीण मिश्रा, आशिष तिवारी, आनंद जोशी, ए.के.तिवारी, गौरव हिंगवे, उमेश जोशी, किशोर जोशी, डॉ.सुधीर ओझा आदी सकल समस्त ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते.

