भुसावळातील डीआरएम कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebrated with Enthusiasm at the DRM Office in Bhusawal भुसावळ (16 एप्रिल 2026) : शहरातील डीआरएम कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, 15 एप्रिल रोजी श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्याहस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करण्यात आले.

डीआरएम कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कार्मिक अधिकारी सुरेंद्र हिवराळे यांनी केले. यावेळी एडीआरएम (प्रशासन) सुनील कुमार सुमन, एडीआरएम (तांत्रिक) एम.के.मीना तसेच सीआरएमएस, एनआरएमयू आणि एससी/एसटी व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनकार्य व योगदानाबाबत विचार मांडले. या कार्यक्रमास विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच युनियन व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !