जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 20 एप्रिल रोजी आयोजन


जळगाव (16 एप्रिल 2026) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दिली.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी राबविण्यात येतो.

त्यानुसार सोमवार, 20 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !