लाखाची लाच भोवली : शनीपेठचा कर्मचारी बडतर्फ तर पोलीस निरीक्षक ‘नियंत्रण कक्षात’


Bribe of One Lakh Proves Costly: Shani Peth Employee Dismissed, Police Inspector Transferred to ‘Control Room’ जळगाव (17 एप्रिल 2026) : एक लाखांची लाच घेताना शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईक विनोद अहिरे यास जळगाव एसीबीने तीन दिवसांपूर्वी रंगेहाथ अटक केली होती. लाच प्रकरणात पोलीस खात्याची बदनामी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित कर्मचार्‍याला तडकाफडकी बडतर्फ केले असून शनीपेठ निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

लाच प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई
गत महिन्यात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांपूर्वी एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी शनीपेठचा पोलीस नाईक विनोद अहिरे याला दोन लाख रुपयांची लाच मागणी करीत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली होती.


या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षका डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करत संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर पावले उचलली. तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरम्यान, आज डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकार्‍यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संवेदनशील घटनांचा आढावा घेत त्यांनी काही अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !