नाशिकमधील धर्मांतर प्रकरण : एसआयटी पोहोचण्यापूर्वी निदा खान पसार, पती मात्र जाळ्यात
Nashik Conversion Case: Nida Khan Flees Before SIT Arrives; Husband Nabbed नाशिक (18 एप्रिल 2026) : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळवणूक आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानचा ठावठिकाणा एसआयटी पथकाला मिळाल्यानंतर पथक अटकेसाठी रवाना झाले मात्र पथक येणार असल्याची चाहूल लागताच संशयीत पसार झाले तर आरोपीचा पती मोईन खान (27) याला कंपनीतून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, निदा मोईन नविद खान (26) असे निदाचे पूर्ण नाव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
चार दिवसांपासून पथक मागावर
दुसरेच काहीतरी नाव घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एसआयटी पथकातील तीन कर्मचारी मोईन खान याच्या घरी पोहोचले होते. तेव्हा सापळा रचून बसलेल्या पथकाने घरात प्रवेश केला. तेव्हा निदा खान व तिचा पती मोईन खान हे दोघेही सापडले नाही. एसआयटीच्या टीमने त्यांच्या घरापासून दूर आपले वाहन थांबवून करून पायी मोईन खानचे घर गाठले. गेल्या चार दिवसांपासून पथक मुंब्रा तसेच भिवंडी ठाण्यात तपास करत होते. साध्या वेशातील पथकाने गुरुवारी व शुक्रवारी सकाळी मोईन खानच्या घराची रेकी करून करून धाड टाकण्यासाठीची वेळ निश्चित केली. शुक्रवारी दुपारी नाशिक गुन्हे शाखेने मुंब्रा पोलिस ठाण्यात मोईन खानला आणले.

निदा खानची कामावरून हकालपट्टी
निदा खानने मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती मोईन खानसोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. आता तिला कामावरून काढल्याची नोटीस कंपनीने दिली. त्यानंतर तिची मावशी नुरी शेख तिला दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे घेऊन गेल्याचे चौकशीत पती मोईन याने सांगितले.
धर्मांतरात अडकवण्याची मुख्य भूमिका
सूत्रांच्या माहितीनुसार, 26 वर्षीय निदा एजाज खान ही कंपनीतील टीम लीडरची प्रमुख आणि कंपनीत काम करणार्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती. नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे. आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती. या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती. निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
एटीएसची इन्ट्री
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार प्रकरणात शुक्रवारी प्रथमच दहशतवादी विरोधी पथकाची एन्ट्री झाली. अटकेतील रजा रफिक मेनन (35) तसेच शफी भिकन शेख (36) यांची विभागीय एटीएस शाखेने तीन तास कसून चौकशी केली. एचआर मॅनेजर निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील एका आरोपीशी संबंध असल्याच्या संशयाने या दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

