पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम

18 व 19 एप्रिल भगवान परशूराम पालखी उत्सव : मान्यवरांची असेल उपस्थिती


जळगाव (18 एप्रिल 2026) : ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था सर्व शाखिय ब्राह्मण समाज जळगावतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भगवान श्री परशुराम पालखीत्सव उत्साहात साजरा होत आहे. शनिवार, 18 व रविवार , 9 रोजी हा सोहळा होणार असून या निमीत्ताने परिसरात भगवान परशूरामाची पालखी काढण्यात येणार आहे.

याच निमित्ताने घराघरात भगवान परशूराम पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून उत्सवाची तयारी केली असल्याचे अध्यक्ष प्रसाद पटवे गुरूजी यांनी सांगितले. या सोहळयासाठी ह.भ.प मंगेश जोशी,ह.भ.प दादा महाराज जोशी,ह.भ.प मनोज महाराज पिंप्राळेकर,ह.भ.प देवदत्त मोरदे, देवेंद्र गढीकर यांचे आर्शिवचन लाभले असून प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेविका मानसी भोईटे, जळगाव जनता सह बँक अध्यक्ष सतिश मदाने,ब्राम्हण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी,जैन इरिगेशनचे व्ही एम भट इ मान्यवर उपस्थीत राहणार असून अमोल जोशी शुक्ल यजु ब्राम्हण संघ अध्यक्ष,संप्तश्रुंगी देवी मंदिराचे मिलींद चौधरी,ब्राम्हण सेवा संस्था अध्यक्ष वसंत देखणे, स्थायी समीती अध्यक्ष डॉ चंद्रशेखर पाटील,अजय जोशी अध्यक्ष विश्व ब्राम्हण महापरिषद,देशस्थ ॠवेदी ब्राम्हण संघाचे विश्वास कुळकर्णी,अ.भा.ब्राम्हण संघ माजी अध्यक्ष शामकांत कलभंडे,शुक्ल यजु ब्राम्हण संघाचे आनंद जोशी इ मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होणार आहे. पालखी म्हणजे देवाचे लोकांमध्ये ‘प्रस्थान’ होय. हा सोहळा भक्ती, आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा संगम घडवणारा एक अद्वितीय अनुभव आहे.


शनिवार, 18 रोजी सायंकाळी 5 वाजता हनुमान मंदिर (एस.एम.आय.टी कॉलेज जवळ) येथून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी टाळ-मृदुंग, डील व लेझीम पथकासह शोभयात्रा श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर, प्रेम नगर येथे सांगता होईल. तर रविवार दि.19/04/2026 रोजी श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर येथे सकाळी 7.00 वाजता भगवान परशुरामाच्या मुर्तीला अभिषेक, आरती व पुजन केले जाईल व सायंकाळी श्रीभगवान परशुराम शोभायात्रेच्या मिरवणुकीत पालखी सामील होईल. तरी सर्वांनी उपस्थित राहावे. आपल्या सहभागातून ब्राह्मण एकता वाढवूया, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पटवे व समस्त ब्रह्मश्री परिवार यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !