नाशिकमध्ये चाललंय काय ? ; तरुणीवर अत्याचार ; आरोपीला अटक


नाशिक (18 एप्रिल 2026)  : भोंदू अशोक खरातने केलेल्या अत्याचारानंतर नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रकार समोर आल्यानंतर समाजमन संतप्त असतानाच आता नव्याने एका तरुणीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली.

काय घडले तरुणीसोबत ?
पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.


गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातला धागाही तोडला
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते.

गळ्यावर लव्ह बाईट, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आणखी काही मुलींचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय
संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !