हवामानात बदल : राज्यात उद्यापासून तीन दिवस वादळी पाऊस
Change in Weather: Stormy Rains Expected in the State for Three Days Starting Tomorrow मुंबई (19 एप्रिल 2026) : राज्यात रविवारी दुपारनंतर दक्षिण मराठवाडा व उत्तर खान्देशात पावसाळी स्थिती निर्माण होणार असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
21 जिल्ह्यात वादळी पाऊस
मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहून 21 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपीट शक्य आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात 14 जिल्ह्यातील तापमान 40 अंशाहून जास्त होते. वर्धा देशात उष्ण ठिकाण ठरले.

मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर जास्त
20 आणि 21 एप्रिलला प्रामुख्याने पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग (विशेषतः बीड, लातूर, नांदेड) व विदर्भातील अमरावतीत वादळी वार्यासह पावसाची जोरदार हजेरी असेल. या भागात मेघगर्जनेसह अचानक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.
वर्धा देशात सर्वात उष्ण
वर्धा 45.0
नागपूर 44.2
अमरावती 44.0
चंद्रपूर 43.4
अकोला 43.3
गोंदिया 43.2
सोलापूर 42.4
परभणी 42.2
जळगाव 41.4
धाराशिव 41.4
अहिल्यानगर 41.1
बीड 41.1
संभाजीनगर 40.6
सांगली 40.0
पुणे 39.6
नाशिक 39.1


