‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

जळगाव क्रिकेट लिगमध्ये षटकार, चौकारांची आतीषबाजी


जळगाव (19 एप्रिल 2026) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-2026, जेसीएल टी 20 क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची आतीषबाजी बघायला मिळत आहे. दुसर्‍या सामन्यात जळगाव कोगटा किंगचा ओम भोसले याने धुवांधार शतक ठोकले. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजच्या गोलंदाजींचा समाचार घेत त्याने 58 चेंडूमध्ये 9 चौकार व 6 षटकार लगावत 108 धावा करुन एकतर्फी सामना फिरवला.

शनिवारी झालेल्या उद्घाटन सामन्यात उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, अशोक जैन यांच्या उपस्थितीत नाणफेक झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जळगाव क्रिकेट लीगमधील सर्वाधिक महाग ठरलेल्या कर्णधार ओम मुंडे याने 48 चेंडूत 81 धावा केल्यात. त्यात त्याने 5 चौकार व 4 षटकार लगावले. त्याला 11 चौकार व 1 षटकारच्या मदतीने 81 धावा 58 चेंडूत करत साहिल गायकर याने उत्तम साथ दिली. दोघांच्या जोरदार खेळीमुळे निर्धारित 20 षटकात 6 गडींच्या मोबदल्यात 176 धावा केल्यात.


जळगाव कोगटा किंग संघाने 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी संयम व आक्रमता दाखवित गोलदाजांवर जोरदार प्रहार केला. शतकवीर ओम भोसले याला जितेंद्र नाईक याने 33 चेंडूत 41 धावा त्यात (5 चौकार व 1 षटकार) करत चांगली साथ दिली. धावगतीवर कुठलाही परिणाम न होऊ देता दोघांनी एकतर्फी सामना खेचून आणला. 16.4 षटकांत 177 धावांचे लक्ष्य दोन गड्यांच्या मोबल्यात सहज पूर्ण केले. मनिष चव्हाण याने तीन चौकारच्या मदतीने 9 चेंडूंमध्ये 16 धावा करत विजयाची औपचारिकता पुर्ण केली. चाळीसगाव चॅलेर्न्सजच्या ओम मुंडे, अमेय कोळी यांना प्रत्येकी 1 गडी बाद करता आले.

दरम्यान सामनावीर म्हणून ओम भोसले यांना गौरविण्यात आले. तर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून मोस्ट डॉट बॉल म्हणून मेहुल इंगळे याने 4 ओव्हर मध्ये 28 धावा देत 2 विकेट घेतल्याने त्याला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नवरंग चहाचे अमर कुकरेजा, अलरिक इलेक्ट्किलचे सीईओ दीपक चौधरी, वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रविण कुंजवाला, दाल परिवाराचे अतुल कोगटा, सागर क्रिकेट क्लबचे विजय मराठे यांची उपस्थिती होती. पंच म्हणून संदीप गांगुर्डे, संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर थर्ट अम्पायर मंगेश नार्वेकर, मॅच रेफरी म्हणून विनित कुलकर्णी यांनी काम पाहिले.

जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर सोमवारी तीन सामने

सोमवार, 20 एप्रिल सकाळी 8.30 वाजेला चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज

सोमवार, 20 एप्रिल दुपारी 3 वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज

सोमवार, 20 एप्रिल सायंकाळी 7.30 वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !