कला तुमच्या जीवनाचा मार्ग सुकर करत असते : चाळीसगावचे चित्रकार दिनेश चव्हाण

पुण्यात पंधरावी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण उत्साहात


पुणे (20 एप्रिल 2026) : साई कला आविष्कार नाट्य संस्था, पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान,पुणे वतीने सलग 15 वी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सायन्स पार्क नाट्यगृह,चिंचवड,पुणे 19 येथे आनंदी व उत्सवाच्या वातावरणात झाला. अध्यक्षस्थानी चाळीसगावचे प्रसिद्ध चित्रकार व कवी दिनेश चव्हाण होते. उद्घाटक सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक डॉ.शांताराम कारंडे (मुंबई) होते.

यांची होती उपस्थिती
प्रवीण तुपे (संस्थापक संचालक -सायन्स पार्क, चिंचवड), प्रा.राजेंद्र सोनवणे, युवा उद्योजक स्वप्निल डुकरे, उद्योजक तानाजी थोरात, युवा नेते जगदीश लाड, संदीप लिंगायत इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम प्रमुख पाहुणे दादा पगार (नाशिक), जेकब कोशी (पुणे), अमृता कुलकर्णी (सोलापूर), वसंत मोरे (भोसरी), मथुरा कोळी (मंगळवेढा), वृषाली बिरारी (नाशिक) यावेळी उपस्थित होते.


यावेळी उद्घाटन वृक्षाला पाणी घालून डॉ शांताराम कारंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ. शांताराम कारंडे म्हणाले की, अनेक संस्था समाजामध्ये काम करतात परंतु एवढं प्रामाणिक आणि भव्य स्वरूपाचं काम कोणी करत नाही ही संस्था गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले.

एक तरी कला शिकावी : दिनेश चव्हाण
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार दिनेश चव्हाण म्हणाले की, जीवनाची प्रगती करण्यासाठी आपण एक तरी कला शिकली पाहिजे कला आपल्या जीवनाला एक वेगळे वळवळण देते. भविष्यातील उत्तम कलाकार आणि उत्तम चित्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून घडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या भव्य सोहळ्यासाठी घेतलेल्या सर्वांची मेहनत सहज लक्षात येते. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला मिळालेल्या उत्तम प्रतिसाद हेच या स्पर्धेचे यश आहे. सर्व मुख्याध्यापक, कलाशिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्या मी मनापासून अभिनंदन करत आहे. कलाकाराकडे एक समाज जिवंत ठेवण्याचे आत्मभान असते. कलाकाराचा आत्मा आज जिवंत ठेवण्याचे काम अशा संस्था करत आहे.

यावेळी शांताराम कारंडे लिखित अंधारातील सत्य लेखसंग्रह, कवी वादळकार यांनी संपादित केलेला पाणी प्रतिनिधी कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच प्रा. राजेंद्र सोनवणे लिखित सुविचार संग्रह 2025 या सुवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातून आलेल्या कलावंत व विद्यार्थ्यांना
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन चित्रकार दिनेश चव्हाण व व्यसपीठातर्फे गौरवण्यात आले. उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करणारे राज्यभरातून आलेल्या कलाकारांच्या आविष्कार रंग या चित्रांचे प्रदर्शन यावेळेस भरवण्यात आले होते.

सूत्रसंचालन कवयित्री रुपा भालेराव तर आभार प्रदर्शन नवनाथ पोकळे यांनी मानले. आयोजन-साई कला आविष्कार संस्था, पुणे चेअरमन-प्रा राजेंद्र दशरथ सोनवणे (कवी -वादळकार, पुणे) व प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल (चेअरमन- कोहिनूर ग्रुप पुणे) यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !