एरंडोल पोलीस ठाण्यात कोयता उगारुन गोंधळ घालणार्‍या संशयीताला अटक


Suspect who created a ruckus by brandishing a sickle at Erandol Police Station arrested. एरंडोल (21 एप्रिल 2026) : मी केस केलेल्या आरोपींना अटक का केली नाही? असा जाब विचारता एरंडोल पोलीस ठाण्यात एकाने लोखंडी कोयता आणून गोंधळ घातला व व कर्मचार्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, 19 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एरंडोल पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना समाधान राधो अहिरे (32, रा.केवडपुरा, एरंडोल) हा तरुण हातात धारदार कोयता घेऊन पोलीस ठाण्यात शिरला. त्याने पोलीस कर्मचार्‍यांकडे ‘मी केस केलेल्या आरोपींना तुम्ही अटक का केली नाही’, असा जाब विचारत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हातात असलेल्या कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवरील टीव्हीवर वार केले, व सीसीटीव्ही प्रणालीच्या मॉनिटरवर कोयत्याने वार करून नुकसान केले.


पोलीस ठाण्यात गोंधळाचे वातावरण
सरकारी कामात अडथळा निर्माण करत असतानाच, संशयित समाधान अहिरे याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी मुकेश आमले यांच्या अंगावर धारदार कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस कर्मचारी दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात संबंधित संशयित आरोपी समाधान अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शंकर पवार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !