अमेरिकन मिलीटरीतून बोलत असल्याचे भासवत भुसावळातील कामगाराला साडेतीन लाखांचा गंडा


Worker from Bhusawal swindled out of ₹3.5 lakh by fraudsters posing as U.S. military personnel भुसावळ (21 एप्रिल 2026) : अमेरिकन मिलीटरीतून बोलत असल्याचे भीती घालून भुसावळातील रहिवासी मात्र मूळच्या युपीतील कामगाराला तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळ तालुक्यातील वरणगाव रोडवरील सहकारी औद्योगिक वसाहतीतील वैशाली इंडस्ट्रीजमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले चंदन मुन्ना मौर्य (34) यांना भामट्यांनी 8 जून 2024 रोजी टायलर नावाच्या फेसबुक पेजवरून संपर्क केला. काही दिवस संवाद साधून विश्वास संपादन करताच मियामी (अमेरिका) येथून पार्सल पाठवले असल्याचे सांगून डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात झाली.


भीती, आमिष आणि बनावट कागदपत्रांचा खेळ
सुरुवातीला मौर्य यांनी नकार दिला मात्र सुडानमध्ये युद्धात अडकलो आहे, पार्सलमध्ये मोठी डॉलरची रक्कम आहे, एफबीआय, अमेरिकन पोलीस व भारतीय कस्टम कारवाई होईल अशा धमक्या व आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. ई-मेल, व्हिडिओ कॉलद्वारे बनावट अधिकारी, मिलिटरी व कस्टम कारवाईचे नाटक रचून विश्वासार्हता निर्माण करण्यात आली.

वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी
डिलिव्हरी चार्जेस, कस्टम शुल्क, वकील फी, एफआययू प्रमाणपत्र, वायर कोड, पार्सल देखभाल शुल्क अशा विविध कारणांखाली वेळोवेळी पैसे मागण्यात आले. मौर्य यांनी जून 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण ती लाख 47 हजार रुपये जमा केले.

संशयातून उघडकीस आले प्रकरण
परदेशी व्यक्ती हिंदीत संवाद साधत असल्याचे लक्षात आल्यानंतर मौर्य यांना संशय आला. त्यानंतर आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी टायलर फेसबुक पेज धारक, तथाकथित ‘ब्ल्यू ऐरॉन’ कंपनी व संबंधित बँक खातेदारांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !