मुलाला मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर हल्ला ; वराडसीमला चौघांविरुद्ध गुन्हा


Elderly Woman Attacked While Attempting to Stop Beating of a Boy; Case Registered Against Four Individuals in Varadsim भुसावळ (22 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे मुलाला सुरू असलेली मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय महिलेवरच हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
आशाबाई शामराव सोनवणे (60, रा.वराडसीम, ता.भुसावळ) यांनी फिर्याद दिली असून रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता त्यांच्या घराबाहेरील अंगणात ही घटना घडली.
फिर्यादीचा मुलगा श्रीकांत सोनवणे यास आरोपींनी घराबाहेर बोलावून लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली.

ही मारहाण थांबवण्यासाठी आशाबाई सोनवणे पुढे गेल्या असता संशयीत राणा रमेश शिंदे याने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी हात पुढे केल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. यावेळी आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी रमेश तुकाराम शिंदे, राणा रमेश शिंदे, जयवीर रमेश शिंदे व सालदार कृष्णा (पूर्ण नाव अज्ञात) (सर्व रा. वराडसीम, ता.भुसावळ) यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादी आशाबाई सोनवणे व त्यांचा मुलगा श्रीकांत सोनवणे जखमी झाले. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !