भुसावळातील नूतन बसस्थानकाला हिंदुसूर्य महाराणा प्रतापांचे नाव द्यावे
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भुसावळ (22 एप्रिल 2026) : भुसावळ शहरात नव्याने सुरू होत असलेल्या बस स्थानकास हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्यावे, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन देवून करण्यात आली.
बसस्थानकाला द्यावे महाराणा प्रतापांचे नाव
मंगळवार, 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भुसावळ येथे जामनेर रोड वरील नव्याने सुरू होत असलेल्या बस स्थानकास हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.

भुसावळ शहरात कोणत्याही व्यापारी संकुलास अथवा रोड ला किंवा ग्राउंडला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात आलेले नाही तर वीर शिरोमणी महाराणा प्रतापांनी देशासाठी केलेले बलिदान समाजाच्या कायम स्मरणात रहावे व येणार्या पिढीला प्रेरणादायी रहावे या हेतूने भुसावळ येथील बसस्थानकास वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत जिल्हा युवकचे अध्यक्ष संदीप राणा, जिल्हाध्यक्ष जळगाव शहर किरण राजपूत, जिल्हा महिला अध्यक्षा सारीका पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष कविता पाटील, ज्येष्ठ समाजसेवक आनंदा पाटील, जिल्हा सचिव मीना राजपूत, जळगाव शहर युवती अध्यक्ष संजना राजपूत, माजी सैनिक परशुराम पाटील, शुभम राजपूत, आशिष राजपूत, आशिष राजपूत, अभिजीत राजपूत व समाजबांधव उपस्थित होते.

