परंपरेचा जपला वारसा : भुसावळातील जय भवानी मंडळाचा अक्षयतृतीयेनिमित्त विशेष कार्यक्रम


Preserving the Legacy of Tradition: Jay Bhavani Mandal of Bhusawal Organizes Special Program on the Occasion of Akshaya Tritiya भुसावळ (22 एप्रिल 2026) : अक्षयतृतीया सण म्हणजे माहेरवाशीणींसाठी आनंदाचे पर्व व सणही. या सणाचे औचित्य साधून शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील काशिराम नगरात जय भवानी नवदुर्गा मंडळातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी झोक्याचा आनंद लुटला आणि पारंपारिक खेळांच्या आठवणींना उजाळा दिला.

महिलांसाठी विविध स्पर्धा
संगीत खुर्ची, उखाणे आणि विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. या खेळांमध्ये प्रभागातील महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने हजर राहून आपला सहभाग नोंदवला. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आणि नगरसेविका पुनम वसंत पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून महिलांशी संवाद साधला.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी नवदुर्गा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लोणारी यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमामुळे महिला वर्गात मोठाच उत्साह जाणवत होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !