भुसावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवर 11 हरकती : दोन दिवसात येणार निकाल !


11 Objections Raised Against Ward Delimitation in Four Gram Panchayats of Bhusawal Taluka: Decision Expected Within Two Days! भुसावळ (22 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेबाबत प्रांतांकडे 11 हरकती दाखल असून मंगळवारी प्रांत कार्यालयात याबाबत सुनावणी झाली तर येत्या दोन दिवसात या संदर्भात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. मंगळवारी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सर्व तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले.

11 हरकती दाखल
भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रशासकीय स्तरावर काही त्रृटी असल्याचे किंवा प्रभाग रचना सोयीनुसार केल्याचे आरोप करत ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक सात हरकती खडके ग्रामपंचायतीबाबत होत्या याशिवाय बेलव्हाय, सुसरी, मन्यारखेडा आणि वांजोळा येथून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली. मंगळवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी प्रत्येक गावातील हरकतदारांचे म्हणणे जाणून घेतले. प्रभाग रचनेत भौगोलिक सीमांचे उल्लंघन झाले आहे का,लोकसंख्येचे निकष पाळले गेले आहेत का, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !