राज्यात आगामी चार दिवसात वादळी पावसासह गारपीट !


Hailstorm accompanied by stormy rains expected in the state over the next four days! पुणे (22 एप्रिल 2026) : राज्यातील काही भागात आगामी चार दिवस वादळी वार्‍यासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता असल्याचे पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप म्हणाले आहेत. एबीपी माझासोबत बोलतानी त्यांनी राज्यात आजपासून पुढील चार दिवस दक्षिण विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट असल्याची शक्यता वर्तवली.

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे
हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील चार दिवस पावसाचे असतील, याकाळात वादळी वार्‍यासह गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याचं सानप यांनी सांगितलं.

राज्यातील काही भागात यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागानं आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ,मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी,बीड चंद्रपूर,यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एका बाजूला पाऊस तर दुसर्‍या बाजूला विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !