यावल तालुक्यात हळहळ : साकळीसह चिंचोलीतील दोघांनी उचलले टोकाचे पाऊल


Shock and Sorrow in Yawal Taluka : Two Individuals—One Each from Sakli and Chincholi—Take an Extreme Step यावल (22 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील चिंचोलीसह साकळीतील दोघांनी अज्ञात कारणाने आत्महत्या केल्याने दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघा प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चिंचोलीतील तरुणाची आत्महत्या
चिंचोली, ता.यावल या गावातील रहिवाशी निलेश अशोक बडगुजर (31) या तरुणाने आपल्या राहत्या घरात झोक्याच्या दोरीच्या सहाह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला कुटुंबीय व नातलगांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे. तरुणाने आत्महत्या का केली? हे कळू शकले नाही.

साकळीच्या इसमाचा गळफास
साकळीतील रहिवासी भानुदास देविदास मोते (56) या इसमाने आपल्या गावातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरी पाणी भरण्याच्या नळीला खांबाला बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना देखील यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. सहा.फौजदार अर्जुन सोनवणे तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !