सूर्य कोपला : उन्हाचा पारा 45 अंशावर ; जनजीवनावर परिणाम
The Sun’s Fury : Mercury Soars to 45 Degrees; Daily Life Disrupted मुंबई (24 एप्रिल 2026) : राज्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर गेला आहे. अकोल्यात विक्रमी 45 अंश तापमानाची नोंद झाली असून त्याचबरोबर राज्यातील अनेक शहरात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हामुळे अनेक जिल्ह्यातील शाळांच्या वेळामध्ये देखील बदल करण्यात आला असून सकाळच्या सत्रात शाळा भरवल्या जात आहेत.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांचे तापमान असे

अकोला – 45
अमरावती – 44.8
चंद्रपूर – 44
गडचिरोली – 44
यवतमाळ – 44
वर्धा – 44.4
नागपूर – 44.4
ब्रह्मपुरी – 44.7
गोंडिया – 44.2
वाशिम – 48.6
बुलढाणा – 48.5
माथेरान – 48.6
जालना – 48.6
बीड – 48.5
उदगीर – 48.4
मालेगाव – 48.6
नाशिक – 48.6
संभाजीनगर – 48.6
धाराशिव – 48.4
सातारा – 48.9
रत्नागिरी – 48.3
नवी मुंबई – 48.2
परभणी – 48
पुणे – 9.9
सांगली – 9.8
मुंबई – 9.6
गोंदिया जिल्ह्याचे तापमान 43.02 अंश सेल्सिअस
गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, शुक्रवारी तापमानाने 43.02 अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वार्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्यात 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
