भुसावळात 26 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक
Maharashtra Navnirman Sena meeting in Bhusawal on the 26th भुसावळ (24 एप्रिल 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे (मुंबई), आशिष साबळे (पुणे ) यांच्या उपस्थितीत शहर व तालुका बैठक शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर प्राईड हॉटेलमध्ये रविवार, 26 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे.
भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी सेना व महिला सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीद द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केले आहे.

