वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या : लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी


वरणगाव (26 एप्रिल 2026) : वरणगाव हे 60 हजार लोकसंख्येचे शहर असून 28 खेडे लागून आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या शहरात असंख्य रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयाला आरोग्य सुविधांअभावी प्राण गमावत आहेत. अनेक नागरिकांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवत आहे. ही समस्या सुटण्यासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी संकटमोचक व मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली.

तातडीने दखल घेण्याच्या सूचना
मंत्रालयातील भेटीनंतर मंत्री गिरीष महाजन यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना करून विनंती केली. यावेळी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपनिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी काळे यांनी केली.

आरोग्य मंत्री आबीटकर यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सांगळे यांना आदेश देऊन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी अजमल भाई फझल भाई, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, आकाश निमकर यावेळी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !