मध्यरात्री कुटूंबाने टरबूज खाल्ले, सकाळी चौघांचे मृतदेहच आढळले !
Family Ate Watermelon at Midnight; Four Bodies Found in the Morning! मुंबई (27 एप्रिल 2026) : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री कुटूंबाने टरबूज खाल्ल्यानंतर त्यातून विषबाधा झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. सूत्रानुसार, मुंबईतील पायधूनी परिसरात े. डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण ?
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री या कुटुंबाने बिर्याणी खाण्याचा बेत आखला होता होता. या चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड (टरबूज) खाल्ले मात्र काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावण्यात आलं. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

नेमक्या कारणांबाबत अस्पष्टता
या घटनेमागे विषबाधेचं कारण असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.
