सोशल मिडीयावर लेवा पाटील समाजाची बदनामी : भुसावळातील माजी नगरसेवकाविरोधात वरणगाव पोलिसात तक्रार


Defamation of Leva Patil Community on Social Media : Complaint Filed Against Former Corporator from Bhusawal with Varangaon Police भुसावळ (28 एप्रिल 2026) : सोशल मीडियावरील फेसबुक प्लॅटफार्मवर लेवा पाटील समाजाविरुद्ध आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याप्रकरणी वरणगाव व परिसरातील लेवा समाज बांधवांनी वरणगाव पोलिसात भुसावळचे माजी नगरसेवक मुकेश गणपत गुंजाळ यांच्याविरोधात निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

चिथावणीखोर व अपमानास्पद भाषेचा वापर
26 एप्रिल 2026 रोजी फेसबुकवर एका राजकीय भाषणाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लेवा पाटील समाजाबाबत अपमानास्पद व चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला असून या टिप्पणीमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लेवा समाजाच्या भावना दुखावल्या
तक्रारदारांनी म्हटले आहे की, भुसावळ शहर व तालुक्यात लेवा समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून नेहमी सामाजिक एकोपा राखण्याचा प्रयत्न केला जातो मात्र संबंधित व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

लोकशाही पद्धतीत निवडणूक प्रक्रिया ही संविधानिक मार्गाने पार पडते मात्र त्यावरून कोणत्याही समाजाविरुद्ध अशोभनीय भाषा वापरणे अयोग्य असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व परिसरात सामाजिक सलोखा कायम ठेवावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

यांची निवेदन देताना उपस्थिती
यावेळी लेवा समाजाचे प्रशांत पाटील, ज्ञानदेव झोपे, चंद्रशेखर झोपे, निलेश खाचणे, संलोष पाटील, निलेश खाचणे, शामल झांबरे, किशोर झांबरे, गणेश झोपे, स्वप्नील पाटील, दुर्गेश कोलते, विनोद झोपे, प्रफुल्ल फालक, सुनील फालक, किशोर झोपे, शुभम जावळे, पराग पाटील, वैभव महाजन, वैभव झोपे, श्रेयस पाटील, कौस्तुब पाटील, दिनेश पाटील, आकाश झांबरे, प्रदीप झोपे, गिरीष पाटील, प्रवीण पाटील, भूषण पाटील, सुशील झोपे, प्रदीप झांबरे आदी समाजबाधव उपस्थित होते


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !