बनारस-पुणे (हडपसर) व अयोध्या-मुंबई अमृत एक्स्प्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा : भुसावळात उद्या जल्लोषात होणार स्वागत


भुसावळ (28 एप्रिल 2026) : भारतीय रेल्वेने आपल्या प्रादेशिक वाहतूक सेवेचा विस्तार करत, महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तरप्रदेशला जोडणार्‍या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. दररोज धावणारी बनारस-हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस)यांचा यात समावेश आहे.

धार्मिक स्थळांना जोडणे शक्य
बनारस-हडपसर(पुणे) गाडी मुळे, काशी विश्वनाथ धामला जाण्याची सोय होऊ शकेल तर अयोध्या-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी, श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. या गाड्यांमुळे महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणे शक्य होईल. विशेषतः दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित मंजूर आणि महाराष्ट्र व उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणार्‍या भाविकांना या गाड्यांचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. थेट संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.

भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 28 एप्रिल 2026 रोजी या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. उद्घाटन विशेष गाडी क्रमांक 02531 बनारस-पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 28 रोजी बनारस येथून 4.45 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 12.55 वाजता हडपसर येथे पोहोचेल. या गाडीला बनारस, ज्ञानपूर रोड, प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी, उरई, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना, राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन व हडपसर थांबा असेल.

असे आहे वेळापत्रक
खंडवा येथे 1.15 वाजता, प्रस्थान 1.20 वाजता
भुसावळ आगमन 3 वाजता, प्रस्थान 3.5 वाजता।
जळगाव आगमन 3.35 वाजता, प्रस्थान 3.40 वाजता
मनमाड आगमन 5.45 वाजता, प्रस्थान 5.50 वाजता

अयोध्या-मुंबई विशेष साप्ताहिक गाडीचे उद्या उद्घाटन
उद्घाटन विशेष गाडी क्रमांक 02212 अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 28 रोजी अयोध्या कॅन्ट येथून 4.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 20.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडभला अयोध्या धाम, सुलतानपूर, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ, प्रयागराज, मानिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे व लोकमान्य टिळक टर्मिनसला थांबा देण्यात आला.

भुसावळ विभागातील प्रमुख थांबे
भुसावळ येथे आगमन 12.30 वाजता, प्रस्थान 12.40 वाजता
जळगाव – आगमन 1.05 वाजता, प्रस्थान 1.10 वाजता
नाशिक रोड – आगमन 4.10 वाजता, प्रस्थान 4.15 वाजता


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !