यावल नगरपालिकेत अद्यावत अग्निशमन तसेच रेस्क्यू सुविधा असलेले वाहन दाखल
A vehicle equipped with state-of-the-art firefighting and rescue facilities has been inducted into the Yawal Municipal Council यावल (28 एप्रिल 2026) : यावल नगरपरिषदेमध्ये अद्यावत सुविधा असलेले अग्निशमन तसेच रेस्क्यू सुविधा असलेले विविध साहित्याने सुसज्ज वाहन दाखल झाले. हे वाहन नगरपालिका संचालनालय मुंबई यांच्या वतीने वाहन प्राप्त झाले. ुमारे सव्वा कोटीच्या किंमतीचे हे वाहन आहे. यामध्ये विविध अद्यावत सेवा सुविधा आहे. वाहन हे सोमवारी संबंधित विभागाकडून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष छाया पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वाहनामुळे शहरात जर प्रसंगी काही दुर्घटना घडली तर त्यासाठी नगरपालिका प्रशासन अधिक सुसज्ज झाले आहे.
आग लागल्यास प्रशासनाची असेल तत्परता
नगरपालिका संचालनालय मुंबई यांच्या वतीने यावल नगर परिषदेकडे अग्निशमन एक छोटे सुसज्ज असे वाहन सोमवारी प्राप्त झाले. सुमारे सव्वा कोटी रुपये या वाहनाची किंमत आहे. हे नुसते अग्निशमन नव्हे तर बचाव कार्य अर्थात एखादी दुर्घटनेमध्ये कोणाला रेस्क्यू करायचा असल्यास त्याची सुविधा देखील या वाहनात आहे. यात प्रामुख्याने पाण्यासह फॉर्म लिक्विडजे ज्वलनशील पदार्थावर नियंत्रण मिळवते ते देखील उपलब्ध आहे तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे कटर, नळ्या, दोरखंड त्याचप्रमाणे प्रसंगी एखादी ठिकाणी प्रचंड अंधार असलं तर नेमका उजेड कोणत्या दिशेने केले पाहिजे त्यासाठीची प्रकाश अद्यावत योजनेचे यात यंत्र लावण्यात आले आहे. 25 लाखाचे हे लाइटिंग यंत्र असून याद्वारे प्रचंड अंधारात देखील जात असताना या वाहनावर एक रिमोट कंट्रोल लाईट सुविधा आहे. ती ज्या दिशेने आपल्याला हवी आहे तेथे वळवता येऊ शकते. त्याचप्रमाणे वादळ वार्यात कुठे झाडे कोसळली त्या खाली कुणी अडकले तर असे मोठ मोठे झाडांना कापण्यासाठी अद्यावत कटर यंत्रणा त्याच प्रमाणे काही मोठा अपघात घडला त्यातून काही जखमीला रेस्क्यू करायचे असेल तर इतर वाहनांना बाजूला करून वाहन कापण्यासाठीची देखील यंत्रणा तेही अद्यावत या ठिकाणी उपलब्ध आहे.

वाहनाचा ताबा पालिकेकडे
सदरचे वाहन हे सोमवारी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील व मुख्याधिकारी व निशीकांत गवई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी सदर वाहनावरील अग्निशमन चालकाला देखील या संदर्भातील प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.
अद्यावत यंत्रणेचा शहरवासीयांना फायदा : नगराध्यक्षा
शहरात दाट वस्तीचा परिसर आहे. काही ठिकाणी बारीक बोळ व गल्ल्या आहेत तिथून अग्निशमन वाहन नेने जिंकरीचे होते. अशा परिस्थितीमध्ये एक छोटे वाहन आणि त्यातील अद्यावत सुविधा यामुळे बचाव कार्य अति जलद गतीने करता येईल. रेस्क्यू करण्यासाठीच्या सुविधा अर्थात कुठे दुर्घटनेत फसलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची सुविधा पूर्वी नगर परिषदेकडे नव्हती मात्र ती आता आल्यामुळे नगरपालिका अधिक सक्षम झाली आहे. शहरात व शहराला लागून असलेल्या गावात कुठे काही घटना घडल्यास निश्चितच या वाहनाचा फायदा होईल, असे नगराध्यक्ष छायाताई पाटील म्हणाल्या.
