भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
भुसावळ (29 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
भी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ या संस्थेचे माजी शालेय समिती चेअरमन तसेच के.नारखेडे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, भुसावळ या संस्थेचे माजी सेक्रेटरी स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांच्या प्रतिमेस त्यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे सेक्रेटरी पी व्ही.पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक यांनी देखील अण्णासाहेबांना अभिवादन केले. याप्रसंगी संगणक विभाग सहित विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी केले. स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांना के. नारखेडे कॉम्प्युटर संस्था, भुसावळ या ठिकाणीदेखील अभिवादन करण्यात आले.

