भुसावळ तालुक्यात पोटनिवडणुकीतील विजयानंतर समर्थकांचा जल्लोष
फुलगावात महेंद्र पाटील तर विल्हाळेत निकिता पाटील यांनी मारली बाजी
Supporters celebrate following victory in the by-election in Bhusawal Taluka भुसावळ (28 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात झाली. बुधवार, 20 रोजी निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. अवघ्या अर्ध्या तासात निकाल हाती आला.
फुलगावात महेंद्र पाटील विजयी
फुलगाव ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्ग जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या जागेसाठी एकूण तीन उमेदवारांमध्ये चुरस होती मात्र मतदारांनी महेंद्र काशीनाथ पाटील यांच्यावर विश्वास दर्शवला. महेंद्र पाटील यांना एकूण 279 मते मिळवत प्रतिस्पर्ध्याचा पराभव करीत विजय मिळवला.

वेल्हाळे ग्रामपंचायतीत निकिता पाटील विजयी
वेल्हाळे ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य पदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली. या अटीतटीच्या सामन्यात निकीता खेमचंद पाटील 191 मते मिळवून विजयी झाल्या. तहसीलदार निता लबडे यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
