बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकीच टॉपर ; असा लागला निकाल
Savitri’s Daughters Top the 12th Grade Exams; Here Are the Results जळगाव (2 एप्रिल 2026) : बारावी परीक्षेचा निकाल शनिवार, 2 मे रोजी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. यंदा बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकीच टॉपर ठरल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के तर राज्याचा निकाल 89.79 टक्के लागला.
15 लाख विद्यार्थी प्रविष्ट
गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणार्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राज्भरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यामध्ये सर्वाधिक संख्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आहे.

राज्य निकालाची टक्केवारी 89.79
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण 14 लाख 44 हजार 713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थी प्रविष्ट होते व 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी 89.79 आहे.
खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 37,559 एवढी असून त्यापैकी 36,941 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 80.21 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 50,876 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 36.44 आहे.