बारावी परीक्षेत भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा डंका : कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
वाणिज्य शाखेचा निकाल 97.82 टक्के : गुणवंतांवर कौतुकाची थाप
भुसावळ (2 मे 2026) : भुसावळातील नामांकीत के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत आपल्या निकालाची परंपरा जपली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या संकेतस्थळावरील निकालानुसार कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला.
असे आहेत गुणवंतः विज्ञान शाखा शंभर टक्के निकाल
प्रथम- वैभवी भूषण सोनार (94.67 टक्के). द्वितीय- मयुरेश जितेंद्र
चौधरी (82.17 टक्के)

कला शाखा : शंभर टक्के निकाल
प्रथम- स्नेहा गौतम शेळके (72.50 टक्के), व्दितीय- प्रणय संतोष
महाले (61.17 टक्के)
वाणिज्य शाखा : शंभर टक्के निकाल
प्रथम- जतीन जितेंद्र पाटील (89.83 टक्के) व द्वितीय- मनन आशिष
जटाळे (88.50 टक्के)
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेश
विज्ञान शाखेतून प्रथम- समृध्दी गोपाळ भोई (80.67), वाणिज्य शाखेतून प्रथम- प्रणाली सुनील भालेराव (82.67 टक्के) व कला शाखेतून प्रथम- स्नेहा गौतम शेळके (72.50 टक्के). विशेष म्हणजे वैभवी भूषण सोनार या विद्यार्थीनीने गणित या विषयांत 100 पैकी 100 गुण मिळविले.
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाचा थाप
कला, विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये मिळवलेल्या यशानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सदस्य डॉ.संजीव एन. नारखेडे, भाग्येश एम.नारखेडे, राज किशोर नारखेडे, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद पी.नेमाडे, विकास पाचपांडे, इतर संस्था सदस्य व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी. पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, के.एन.सी.टी.आय.प्रमुख बी.ए.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.के. खाचणे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.