रावेर ग्रामीण रुग्णालयात आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने मंजूर डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण ; रुग्णांना मोठा दिलासा
रावेर (3 मे 2026) : रावेर शहरातील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डायलिसीस सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याहस्ते पार पडले. आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे हे सेंटर मंजूर होऊन प्रत्यक्षात आले आहे.
रुग्णांना मोठा दिलासा
रावेर शहर व परिसरातील रुग्णांना यापूर्वी डायलिसिससाठी जळगाव किंवा बुर्हानपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत होता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यास यश मिळवले. या सुविधेमुळे आता स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑनलाईन लोकार्पणानंतर स्थानिक पातळीवरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, सीमा जमादार, प्रमिला पाटील, योगिता महाजन, अर्चना पाटील, अमोल पाटील, पद्माकर महाजन, दिलीप पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, अमित खरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना, आमदार अमोल जावळे यांचे रावेर वासीयांतर्फे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, वासु नरवाडे, अरुण शिंदे, सी.एस.पाटील, रवी पाटील, अॅड.सूर्यकांत देशमुख, राहुल पाटील, वाय.व्ही.पाटील, संदीप सावळे, पी.के.महाजन, पवन चौधरी, जगदीश घेटे, पंकज वाघ, चंद्रकांत वैदकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी तर प्रास्ताविक व आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैभव गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश मुकुंद, शारदा धुंदळे, तसेच डायलिसिस सेंटरचे कर्मचारी तेजस गाढे, सुलेमान शाह, प्रकाश तायडे आणि इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या डायलिसीस सेंटरमध्ये एकावेळी पाच रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी या शासकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपा जेधे यांनी केले आहे.