भुसावळात भीमगीत कराओके गायन स्पर्धा उत्साहात
भुसावळ (3 मे 2026) : शहरातील वंशिका प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ‘कोण होणार आवाज भीमाचा’ ही भव्य भीमगीत कराओके गायन स्पर्धा झाली. त्यात 27 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
भुसावळ नगरपरिषदेच्या नगरसेविका सीमा नरवाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास तायडे, सेवानिवृत्त रेल्वे टी.सी.राजेंद्र तायडे, ईस्तु शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे उपस्थित होते. परीक्षक म्हणून संगीत विशारद सुधा राशदवार व अर्चना रणधीर यांनी काम पाहिले.

जामनेर येथील कुर्बान शाह यांनी प्रथम, मुक्ताईनगरातील सीमा इंगळे यांचा द्वितीय तर भुसावळ येथील संजय निकम यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त केला. तीनही विजयी स्पर्धेकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन संभाजी सोनवणे तर आभार प्रदर्शन विवेक नरवाडे यांनी मानले.