बंगालसह आसाम निवडणुकीतील विजयानंतर भुसावळात भाजपाचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी वाटली झालमुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष


BJP Celebrates in Bhusawal Following Election Victories in Bengal and Assam भुसावळ (4 मे 2026) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर भुसावळातील भाजपेयींनी तुफान जल्लोष केला.

कार्यकर्त्यांनी वाटली झालमुरी
प्रसंगी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय व वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी झालमुरी व पेढे वाटून जल्लोष केला.

यांची होती उपस्थिती
राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर यांच्यासह नगरसेविका आशा कैलास पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, विशाल जंगले, सुजित भोळे, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, जयंत माहुरकर, सागर चौधरी, गौरव आवटे, शंकर शेळके, राहुल तायडे, संतोष ठोकळ, रवी दाभाडे, विलास सातदिवे, नंदकिशोर बडगुजर, चेतन जैन, प्रशांत पाटील, रामशंकर दुबे तसेच माजी तालुकाप्रमुख भालचंद्र पाटील, कुणाल येवले, नगरसेवक संजय नाहाटा, पराग भोळे, हॉटेल व्यावसायिक सारंगधर पाटील, मनीष सारंगधर पाटील, योगेंद्र हरणे, वासू बोंडे, गोपी राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !