भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत आयुष जैन प्रथम
जैन समाज बांधवांतर्फे जंगी सत्कार : वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
Ayush Jain secures first place in the Commerce stream at P.O. Nahata College, Bhusawal. भुसावळ (5 मे 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात बालाजी गल्ली, गांधी चौक परिसरातील अरिहंत किराणाचे माजी संचालक नेमीचंद जैन यांचा मुलगा आयुष जैन याने नेत्रदीपक यश संपादन केले. आयुषने वाणिज्य शाखेत 93.33 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
समाजबांधवांनी केला सत्कार
आयुषच्या या घवघवीत यशामुळे जैन समाज बांधवांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी आयुषला मिठाई भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया, विशाल चोरडिया, विनोद मेहता, विजय चोरडिया, शिरीष नाहाटा, पप्पू नहार, आय.जी.नहार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. आयुषच्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

