गिरडगाव-वाघोदा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाकर पाटील बिनविरोध


यावल (8 मे 2026) : यावल तालुक्यातील गिरडगाव -वाघोदा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शकीला उमर तडवी यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त होती. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठीची निवडीसाठी विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच आशा हुसेन तडवी होत्या.

सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आलेल्या या निवडणुकीत प्रभाकर रामदास पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झालेल्या प्रभाकर उर्फ बाळू पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !