भुसावळातील बियाणी स्कूलची यशाची परंपरा कायम ; दहावी परीचेचा घवघवीत निकाल
भुसावळ (8 मे 2026) : भुसावळ शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व मराठी माध्यम) मधील विद्यार्थ्यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
इंग्रजी माध्यमाचे चमकते तारे
इंग्रजी माध्यमात नाथजोगी लोचना संदीप हिने 97.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला तर सोनवणे तेजश्री उमेश हिने 92.20% गुणांसह द्वितीय तर खत्री दीपेश विजय याने 89.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.


मराठी माध्यमाची दमदार कामगिरी
मराठी माध्यमातही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून, झोपे भूषण वासुदेव 86.20% गुणांसह प्रथम आला आहे. ललित नामदेव चौधरी (84.40%) याने द्वितीय तर पाटील तन्मय प्रल्हाद (83.80%) याने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, एक्झिकेटिव्ह डायरेक्टर रोनक बियाणी, पियुष बियाणी, डॉ.आयुषी बियाणी आणि प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हिंदी विद्यालयाचा 82.50 टक्के निकाला
भुसावळ : शहरातील श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 82.50 टक्के लागला. या परीक्षेत सरोज सतीश जाधव (82 %) प्रथम तर दीपाली विकास पारधे आणि पूर्व अमित परदेशी या दोघांनी प्रत्येकी (79 %) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.
वैष्णवी राकेश जाधव हिने (70.80 %) गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य के.बी.सक्सेना आणि पर्यवेक्षक एम.आर.शहा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. हिंदी सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
