भुसावळात भाजपातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
भुसावळ (10 मे 2026) : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्याहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांनी महाराणा प्रताप यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, मनोज बियाणी, नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, पिंटू ठाकूर, सुजित भोळे, मुकेश पाटील, रुपेश देशमुख, प्रा.प्रशांत नरवाडे, ललित मराठे, संग्रामसिंग पाटील, समिती अध्यक्ष विक्रांतसिंग राजपूत, समिती सचिव आकाश राजपूत, उपाध्यक्ष नकुल राजपूत, सहसचिव गोपीसिंग राजपूत, जयप्रकाश शुक्ला, भाजपा शहर सरचिटणीस जयंत माहुरकर, सागर चौधरी, शिक्षक आघाडी जिल्ह1ाध्यक्ष मुकेश मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, शैलेजा पाटील, अलका शेळके, रणधीर इंगळे, शंकर शेळके, रेहमान शेख, ऋषभसिंग राजपूत, मनिष पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

