वडिलांनीच सावत्र मुलाला संपवले : तपासात समोर आले ‘हे’ कारण


पुणे (11 मे 2026) : घरगुती वादातून भीषण हत्याकांड घडल्याची घटना बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात घडली. जमिनीच्या वाटपाच्या वादातून सूरज संजय गुरुमकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत सूरजचे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुमकर कुटुंबात गेल्2या काही दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून सतत वाद सुरू होते आणि याच वादातून सूरजची हत्या झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मृत तरुणाचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलिस या तिघांचीही सखोल चौकशी करत असून जमिनीच्या वादातून घडलेल्या या भीषण हत्याकांडाचा पुढील तपास सुरू आहे.







गुरुमकर कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून तीव्र मतभेद आणि वाद सुरू होते, ज्याचे पर्यवसान अखेर या हत्याकांडांत झाले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृत सूरजचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !