आम्ही पदभार दिला नसल्याने गायत्री भंगाळे याच नगराध्यक्षा ; माजी आमदार संतोष चौधरींचा दावा
“Since we have not handed over the charge, Gayatri Bhangale remains the Municipal Council President,” claims former MLA Santosh Chaudhary. भुसावळ (11 मे 2026) : भुसावळ पालिकेत प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी सोमवारी स्वीकारल्यानंतर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आम्ही अद्याप पदभार दिला नसल्याने भंगाळे याच पालिकेच्या अधिकृत नगराध्यक्षा असतील.
काय म्हणालेे माजी आमदार संतोष चौधरी ?
राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, मुळातच
जिल्हाधिकार्यांनी यापूर्वी दिलेले पत्र न्यायालयाच्या निर्णयाआधीचे होते ते देखील आम्हाला प्राप्त झालेले नाही. न्यायालयाचा निर्णय अलीकडे आला असून आम्ही त्यात सेफ आहोत.


न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आम्ही निर्णय देवू शकत नाही त्यामुळे पदभार दिलेला नसल्याने गायत्री भंगाळे याच भुसावळच्या नगराध्यक्षा आहेत. भाजपाला गुलाल उधळवू द्या, फटाके फोडू द्या हे त्यांचे मुंगेरीलालचे स्वप्ने आहेत. प्रभारी नगराध्यक्षांच्या स्वाक्षर्या कुठेही ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असा दावाही चौधरी यांनी केला.
