भुसावळच्या बडा हनुमान मंदिरात 121 व्या सप्ताहानिमित्त आम्र महोत्सव : 201 किलो आंब्यांचा नैवेद्य
सामूहिक हनुमान चालीसा पठण सोहळ्यात भाविकांना आंबे, बुंदी, खिचडी प्रसादाचे वितरण
Mango Festival at Bhusawal’s Bada Hanuman Temple Marks 121st Weekly Celebration: Offering of 201 Kilograms of Mangoes भुसावळ (16 मे 2026) : शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील प्रसिद्ध श्री बडा हनुमान मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह शनिवारी, 16 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिरात आम्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दर शनिवारी सामूहिक हनुमान
धर्मजागृती आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमात दर शनिवारी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाते.विशेष 121 व्या सप्ताहानिमित्त हनुमानजींना 201 किलो आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार असून भाविकांना आंबा प्रसाद,बुंदी,खिचडी-भात तसेच केळींचा प्रसाद वितरित करण्यात येणार आहे.शनिवारी सायंकाळी 7 वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास सुरुवात होणार असून,मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा व आम्र महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन मंदिरातर्फे वैष्णव परिवार व भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.








