पुरस्कारातून केवळ व्यक्तीला नव्हे तर त्या क्षेत्रालाही मिळते चालना : भुसावळात मंत्री संजय सावकारे

महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार्‍या भुसावळच्या रजनी सावकारे यांचा ‘महिला सन्मान’ पुरस्काराने गौरव


Awards provide impetus not only to the individual but also to the entire field: Minister Sanjay Savkare in Bhusawal. भुसावळ (16 मे 2026) : वृत्तपत्रांकडून मिळणारे पुरस्कार हे केवळ व्यक्तीला नव्हे तर त्या क्षेत्राला चालना मिळून ग्रोथ होते, असे विचार भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले. शहरातील स्टार लॉनमध्ये शुक्रवार, 15 रोजी सायंकाळी विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री सावकारे बोलत होते. याप्रसंगी महिला व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांचा ‘महिला सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मान्यवरांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात प्रसंगी विविध नामांकीत क्षेत्रात कार्य करणार्‍या 30 मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला तसेच महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या दहा महिलांचा महिला सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मंत्री सावकारे यांनी मार्गदर्शनात पुरस्काराच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगून व्यक्ती अधिक जोमाने कामाला लागतो, असेही आवर्जून सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, दिव्य मराठीचे युनिट हेड संजीव पाटील, भुसावळचे ब्युरो चीफ हेमंत जोशी, स्टार रिसोर्टचे संचालक गोपाळ चौधरी आदींची उपस्थिती होती.

पुरस्काराने जवाबदारी वाढली : रजनी सावकारे
आपल्याला मिळालेला ‘महिला सन्मान’ हा पुरस्कार केवळ माझा नसून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करणार्‍या प्रत्येक महिलांचा आणि मला पाठबळ देणार्‍या सर्व सहकार्‍यांचा आहे. पुरस्कार मिळाल्याने आपल्यावर अधिक चांगले काम करण्याची जवाबदारी वाढली आहे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, हा माझा कायम प्रयत्न राहिला आहे. समाजात महिलांना समान संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. हा सन्मान मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे भुसावळच्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !