पावसाळ्यापूर्वीच विधानपरिषदेची निवडणूक : ‘असा आहे निवडणूक कार्यक्रम’
Legislative Council Election Before the Monsoon: ‘Here is the Election Schedule’ मुंबई (18 मे 2026) : विधानपरिषदेची निवडणुकीचे पडघम वाजले असून 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे.
अडीच महिन्यांपासून जागा रिक्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक-
सोलापूर
अहिल्यानगर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
पुणे
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
अमरावती
धाराशिव-लातूर-बीड
परभणी-हिंगोली
छत्रपती संभाजी नगर-जालना
नागपूर
महाराष्ट्र
अशी होते सदस्यांची निवड
30 आमदारांकडून, 22 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, सात पदवीधर मतदारसंघातून, सात शिक्षक मतदारसंघातून व 12 राज्यपाल नियुक्त करतात.










