भारतीय बौद्ध महासभेची यावल तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर

यावल तालुकाध्यक्षपदी बी.डी.महाले तर कोषाध्यक्षपदी महेंद्र पांडव


फैजपूर (18 मे 2026) : शहरातील सम्राट बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेची नवीन यावल तालुका कार्यकारिणीची निवडण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुमंगल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुरवातीला बी.डी.महाले यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

अशी आहे नूतन कार्यकारीणी
यावल तालुकाध्यक्ष बी.डी.महाले, सरचिटणीस सुधाकर तायडे, कोषाध्यक्ष महेंद्र पांडव यांची निवड सभेच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी प्रा.डॉ.संजीव सावळे, सुशीलकुमार हिवाळे, रमेश सावळे, डॉ.के.वाय.सुरवाडे, संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल आदी पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !