भुसावळातील तरुणीचे जबरदस्तीने मुस्लीम धर्मांतर : भाजपा आक्रमक ; प्रांताधिकार्यांना निवेदन
Forced Conversion of Young Woman from Bhusawal to Islam: BJP Takes Aggressive Stance; Submits Memorandum to Sub-Divisional Officer भुसावळ (19 मे 2026) : आजोळी आलेल्या 12 बारावीच्या विद्यार्थिनीचे जबरदस्तीने धर्मांतर करीत निकाह लावण्यात आला व सातत्याने पीडीतेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. लव्ह जिहाद प्रकरणी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करून, प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देवून करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, उत्तर विभाग शहराध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग शहराध्यक्ष किरण कोलते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रांताधिकारी प्रशासनाला देण्यात आले.



दोषी आरोपीवर व्हावी कारवाई
शहरातील प्रकरण ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असून प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आरोपींना मदत करणार्या व्यक्तींनाही सहआरोपी करण्यात यावे व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार विनंते यांनी निवेदन स्वीकारले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी मनोज बियाणी, पुरुषोत्तम नारखेडे, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र आवटे, अॅड.बोधराज चौधरी, मुकेश पाटील, अजय नागराणी, सुजित भोळे, विशाल नाटकर, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, प्राची पाटील, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, उदय पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, जयंत माहूरकर, सागर चौधरी, शैलेजा पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता आंबेकर, भारती वैष्णव, माधुरी चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, कैलास शेलोडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रशांत नेवे, गोपीसिंग राजपूत, गौरव लोणारी, पवन शिंदे, चेतन सावकारे, सुजित वानखेडे, प्रवीण कुटे, उमेश चौधरी, सागर साळी, जयप्रकाश शुक्ला, संजय विश्वकर्मा, धनराज वारके, आकाश राजपूत, विवेक इंगळे, खिलेश महाजन, तेजस झांबरे, आकाश वारके, हर्षल चौधरी, सचिन बर्हाटे, गणेश महाजन, रोहन वारुळकर, नकुल महाजन तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






